Sharad Pawar । निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिला मोठा धक्का

Sharad Pawar

Sharad Pawar । अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला. यावर कायदेशीर निवडणूक आयोगासमोर काल सुनावणी पार पडली. पहिल्या दिवशी अजित पवार गटाने आपली बाजू मांडली मात्र पहिल्याच दिवशी शरद पवार गटाला मोठा धक्का निवडणूक आयोगाने दिला आहे. शपथपत्र बोगस असल्याचे शरद पवारांचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत.

Accident News । मोठी बातमी! माळशेज घाटात ट्रक आणि बसची भीषण धडक; २० प्रवासी गंभीर जखमी

अजित पवार यांनी मृत व्यक्तीचे शपथपत्र जोडले असल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता. मात्र यावर मृत व्यक्तीचे नव्हे तर त्यांच्या मुलांचे शपथपत्र जोडल्याचे अजित पवार गटाच्या वकिलांनी स्पष्ट केले. यानंतर हे शपथपत्र बोगस नसल्याचे देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांचा आक्षेप फेटाळला आहे. यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

Ranbir Kapoor । मोठी बातमी! अभिनेता रणबीर कपूरचा ‘तो’ व्हिडिओ पाहून लोक हैराण

पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार

राष्ट्रवादी कुणाची आता यावर पुढील सुनावणी नऊ ऑक्टोबरला होणार आहे. मागच्या काही दिवसापासून शिवसेना कोणाची हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. शिवसेना कोणाची या सुनावणी दरम्यान शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवलं गेलं. त्याच प्रकारे कारवाई राष्ट्रवादीच्या बाबतीत होणार का? अशा चर्चा देखील आता रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Crime News । मुलीसोबत बोलण्यास मनाई केली म्हणून दोन विद्यार्थ्यांना राग अनावर… शिक्षकावरच झाडली गोळी; व्हिडिओ केला व्हायरल

Spread the love