Sharad Pawar । शरद पवारांचे टेन्शन वाढवणारी बातमी; एक्झिट पोलमध्ये लोकशाही वृत्तवाहिनीचा धक्कादायक दावा

Sharad Pawar

Sharad Pawar । महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालापूर्वी अनेक एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामध्ये काहींनी महायुतीच्या मोठ्या विजयाचा दावा केला आहे तर कुठे महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी ‘लोकशाही’ या मराठी टेलिव्हिजन वाहिनीच्या सर्वेक्षणामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी काहीसा तणाव निर्माण होत असल्याचे दिसत आहे. (Lok Sabha Election 2024)

Delhi Metro Video । दिल्ली मेट्रोत पुन्हा धक्कादायक प्रकार, दोन तरुण एकमेकांना भिडले; पाहा व्हिडीओ

लोकशाही सर्वेक्षणात ज्या बड्या नेत्यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यात राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या नावाचाही समावेश आहे. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत आहे.

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

प्रकाश आंबेडकरांचाही पराभव होऊ शकतो?

सुप्रिया सुळे यांच्याशिवाय एक्झिट पोलमध्ये पराभूत झालेल्या नेत्यांमध्ये भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले (सातारा), नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), नवनीत राणा (अमरावती), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) आणि व्हीबीएचे प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष ४ तारखेच्या निकालाकडे लागले आहे.

Crime News । जमिनीच्या वादातून मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न; पोलिसांसमोर घडला धक्कादायक प्रकार

Spread the love