Delhi Metro Video । दिल्ली मेट्रोत पुन्हा धक्कादायक प्रकार, दोन तरुण एकमेकांना भिडले; पाहा व्हिडीओ

Delhi Metro Viral Video

Delhi Metro Video । दिल्ली मेट्रोने दररोज लाखो लोक प्रवास करतात. मेट्रोमुळे लोकांना मोठी सुविधा मिळते. विशेषत: उन्हाळ्याच्या काळात दिल्ली मेट्रोमध्ये लोकांना उन्हापासून आणि उष्णतेपासून दिलासा मिळतो. पण गेल्या काही काळापासून दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये लोक विचित्र कारवाया करताना दिसत होते.

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

दिल्ली मेट्रोत काहीजण अश्लील कृत्य करतात तर कधी कधी प्रवासी आपापसात भांडताना दिसले आहेत. दिल्ली मेट्रोचे असे व्हिडिओ व्हायरल होणे आता सामान्य झाले आहे. सध्या दिल्ली मेट्रोचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुण भांडताना दिसत आहेत.

Crime News । जमिनीच्या वादातून मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न; पोलिसांसमोर घडला धक्कादायक प्रकार

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन तरुण दिसत आहेत. एक तरुण दुसऱ्या तरुणाच्या पायावर पाय ठेवतो. इथून दोघांमध्ये भांडण सुरू होते. दोन्ही तरुण वाद घालू लागले आणि एकमेकांचा अपमान करू लागले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील याबाबत वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Politics News । राजकारणातून मोठी बातमी! अजितदादांना धक्का? अनेक आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

Spread the love