Sharad Pawar । शरद पवारांचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाले, “भाजप पक्षामध्ये जावं असं…”

Sharad Pawar

Sharad Pawar । अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केल्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याचबरोबर अजित पवार गटाच्या नेत्यांनी तर याआधीही शरद पवारांनी भाजपसोबत बोलणी केली होती असा दावा केला आहे. शरद पवार भाजपसोबत जाण्याचा विचार करत होते मात्र त्यांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला असं वक्तव्य तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल आहे. त्यामुळे खरंच शरद पवार भाजप सोबत जाणार होते का? त्यांची भूमिका नेमकी काय होती? याबाबत स्वतः शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

Sharad Pawar । शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का; युवा नेता सोडणार साथ

शरद पवार म्हणाले आमच्या पक्षातील अनेकांचे मत होतं की आपण भाजपसोबत जावे. दोन पद्धतीने भाजप सोबत जाण्याबद्दल बोलत होते. एक त्यांच्याबरोबर सत्तेत जावं आणि दुसरं म्हणजे भाजप पक्षात जावं असं काही सहकाऱ्यांच म्हणणं होतं. असा शरद पवार यांनी खुलासा केला आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “2004 मध्ये प्रफुल पटेल यांचा देखील आग्रह होता की आपण भाजपसोबत हातमिळवणी करावी. अटल बिहारी वाजपेयींसारखा नेता दुसरं कुणाला स्वीकारणार नाही आपण त्यांच्याबरोबर जावो त्यांच्या आघाडीत सहभागी व्हावं मात्र ते मी स्वीकारणार नाही. असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.

Cyclone Remal । ब्रेकिंग! काही तासांत धडकणार रेमाल तुफानी चक्रीवादळ; ‘या’ ठिकाणी दिली धोक्याची घंटा

माझं कुटुंब डाव्या विचारसरणीच आहे. माझ्या आणि भाजपचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत. भाजपचा मी अनादर करत नाही मात्र आमचे विचार वेगळे असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा मी निर्णय घेतला नाही. असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे.

Shahjahanpur Accident । ब्रेकिंग! भाविकांच्या बसला ट्रकने दिली जोरदार धडक; भीषण अपघातात चिरडून ११ जणांचा मृत्यू तर १० जखमी

Spread the love