Shahjahanpur Accident । ब्रेकिंग! भाविकांच्या बसला ट्रकने दिली जोरदार धडक; भीषण अपघातात चिरडून ११ जणांचा मृत्यू तर १० जखमी

Shahjahanpur Accident

Shahjahanpur Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे शनिवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला, रस्ते अपघातात बळी गेलेले हे सर्व सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी होते. हे सर्वजण उत्तराखंडला पूर्णागिरी मातेच्या दर्शनासाठी जात असताना वाटेत हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Cyclone Remal | आत्ताची सर्वात मोठी बातमी! 48 तासांत धडकणार ‘रेमल’ चक्रीवादळ

हा अपघात शहाजहानपूरच्या खुटार भागात गोला-लखीमपूर रोडवर शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. या लोकांना घेऊन जाणारी बस एका ढाब्यासमोर उभी असताना भरधाव वेगात येणारा गिट्टीने भरलेला डंपर बसवर पलटी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Viral Video । अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत भर स्टेडियममध्ये घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस गोला मार्गे खुटार येथे पोहोचली होती. तेथे चालकाने बस एका ढाब्याच्या बाहेर खाण्यापिण्यासाठी उभी केली. दरम्यान, गोळ्याकडे जाणारा डंपर नियंत्रणाबाहेर जाऊन बसला धडकून तेथेच उलटला. डंपरची धडक एवढी जोरदार होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

Bachchu Kadu । बच्चू कडू यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “गुवाहाटीला जाताना उद्धव ठाकरेंना फोन केला पण…”

Spread the love