Sharad Pawar । सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) मतदान पूर्ण झाले आहे. सध्या सर्वजण आता निकालाची प्रतीक्षा करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं लक्ष आहे. यामध्येच आता ऐन निवडणूक काळात शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील युवा चेहरा राष्ट्रवादीला सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Cyclone Remal | आत्ताची सर्वात मोठी बातमी! 48 तासांत धडकणार ‘रेमल’ चक्रीवादळ
दिल्लीतील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे धीरज शर्मा (Dheeraj Sharma) हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या दिल्लीत रंगली आहे. धीरज शर्मा यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Viral Video । अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत भर स्टेडियममध्ये घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ
धीरज शर्मा यांनी जरी पक्षातील पदांचा म्हणजेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. “मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या सर्व पदांमधून स्वत:ला मुक्त करतो आहे, अशी पोस्ट धीरज शर्मा यांनी फेसबुकवर लिहिली आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.