Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का बसणार? तीन आमदार देणार सोडचिट्ठी?

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का बसणार? तीन आमदार देणार सोडचिट्ठी

Sharad Pawar । अजित पवार यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले अनेक आमदारांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला. आता पुन्हा एकदा शरद पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे शरद पवार गटात खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar)

Crop Update । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! पाण्याअभावी पीके धोक्यात

काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम?

शरद पवार गटातील आणखी तीन आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच आमच्या गटामध्ये समाविष्ट होतील. असा दावा धर्मरावबाबा यांनी केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आता शरद पवारांची साथ सोडणारे ते तीन आमदार कोण? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. सध्या आमच्याकडे 45 आमदार असून तीन आमदार वाढून 48 होणार आहेत. मात्र हे तीन आमदार नक्की कोण येणार? आहेत यांचं नाव मी सांगत नाही असं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले आहेत.

Success Story । दुध विकून सालगडी झाला 5 एकरचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

सध्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या आमच्या पक्षांची बांधणी करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्याच ठिकाणी आम्ही चाचणी सुरू आहे. निवडणुका तोंडावर आल्या असून वेळ देखील खूप कमी आहे. त्यामुळे आम्हालाही स्ट्रॅटेजी वापरावी लागत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

Shiv Thackeray । शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, पाहा व्हिडीओ व्हिडीओ

Spread the love