Chandrayaan-3 LIVE Updates । अखेर ‘चांद्रयान-3’च्या लँडिंगला सुरुवात! इस्रोने दिली सर्वात मोठी अपडेट

Landing of 'Chandrayaan-3' finally started! Biggest update given by ISRO

Chandrayaan-3 LIVE Updates । ‘चांद्रयान-3’ च्या लँडिंगला (Chandrayaan-3 Landing) सुरुवात झाली आहे. देशासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. देशासह संपूर्ण जगाचे याकडे (Chandrayaan-3) लक्ष लागले आहे. चंद्रयान-3 पाठवण्यासाठी एलव्हीएम-3 लाँचरचा वापर केला आहे. चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लँडिंगसाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती इस्रोने (ISRO) दिली आहे. (Chandrayaan 3 Live Streaming)

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का बसणार? तीन आमदार देणार सोडचिट्ठी?

लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर गेला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनेल. दरम्यान, चंद्रयान-3 मधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याबद्दल इस्रोकडून सतत तपासणी केली जात आहे. “चांद्रयान-3 ने आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला असल्याने यापुढील टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करेल, असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे. (Chandrayaan 3 Streaming)

Crop Update । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! पाण्याअभावी पीके धोक्यात

लँडिंग यशस्वी झाल्यानंतर काय होणार?

दरम्यान, लँडिंग यशस्वी झाल्यानंतर त्यातून प्रज्ञान हा सहा पायांचा रोव्हर बाहेर येणार आहे आणि त्याला इस्त्रोकडून कमांड मिळताच तो चंद्राच्या पृष्टभागावर चालायला सुरुवात करेल. तो ५०० मीटरपर्यंत जाऊन पाणी आणि तेथील वातावरणाबाबतची सर्व माहिती इस्रोला देईल. तसेच त्याच्या चाकांवर लावण्यात आलेल्या अशोक स्तंभ आणि इस्रोच्या चिन्हाची छापही चंद्रावर सोडणार आहे.

Success Story । दुध विकून सालगडी झाला 5 एकरचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

अल्टिट्यूड होल्डिंग फेज यशस्वी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लँडिंग प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे रफ ब्रेकिंग पूर्ण झाली आहे. या फेजनंतर, 10 सेकंदांची अल्टिट्यूड होल्डिंग फेजही (Altitude holding phase) यशस्वी झालेली आहे. त्यानंतर पुढील फेज म्हणजे फाईन ब्रेकिंग फेजला (Fine breaking phase) सुरुवात झालेली आहे.

Shiv Thackeray । शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, पाहा व्हिडीओ व्हिडीओ

Spread the love