Crop Update । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! पाण्याअभावी पीके धोक्यात

Increase in the concern of farmers! Crops in danger due to lack of water

Crop Update । पुणे : राज्याच्या काही भागात यावर्षी पावसाने दडी (Rain in Maharashtra) मारली आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच चिंतेत सापडला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरीही समाधानकारक पाऊस (Rain) झाला नाही. शेतकऱ्यांचे पावसाअभावी पेरणी केलेले पहिले पीक वाया गेले. परंतु त्यांनी हार न मानता दुबार पेरणी केल्यानंतर जेमतेम उगवलेल्या पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. (Latest Marathi News)

Success Story । दुध विकून सालगडी झाला 5 एकरचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

पुणे जिल्ह्यातील तालुक्यात ७१ टक्के पेरणी झाली आहे. परंतु पावसाने पाठ फिरवल्याने पिके जळण्याच्या (Crop Crisis) मार्गावर आली आहेत. या तालुक्यात एकूण खरीपाच सरासरी क्षेत्र १९,२१९.३५ हेक्टर असून त्यापैकी पेरणी झालेले क्षेत्र १३,७१९.२५ हेक्टर आहे. एकंदरीतच एकूण खरीप क्षेत्रातील २८.६२ टक्के क्षेत्र म्हणजेच ५,५००.१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली नाही.

Shiv Thackeray । शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, पाहा व्हिडीओ व्हिडीओ

भिवडी, सासवड मंडलांतील काही गावे सोडली तर उरलेल्या ठिकाणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जर येत्या काळात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे. हवामान खात्याकडून या महिन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता हाती थोडेफार पीक लागते की नाही, याचीही चिंता सतावू लागली आहे.

Asia Cup 2023 । आशिया चषकापूर्वीच संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज बाहेर

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. जर येत्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. पावसाअभावी शेतीव्यवसायाचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करायचीय? फॉलो करा ही सोपी पद्धत, घरबसल्या मिनिटात होईल काम

Spread the love