Sharad Pawar | धनंजय मुंडेंचं नाव काढताच शरद पवार चिडले; पाहा Video

Dhananjay Munde

Sharad Pawar | मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी खासदार शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला यावेळी उत्तर देताना शरद पवार यांनी थेट धनंजय मुंडे यांची लायकीच काढली आहे.

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य

पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांना राग अनावर झाला. यावेळी शरद पवार यांनी तुम्ही आता ज्याचं नाव घेतलं त्याची बोलण्याची लायकी नाही असा पलटवार केला. शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विधानावर जास्त बोलणे टाळले मात्र पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी धनंजय मुंडे यांची लायकी काढली. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Mumbai Crime । धक्कादायक प्रकरण! तंदुरी चिकनसाठी हत्या, मुख्यमंत्री कार्यालयात तैनात कॉन्स्टेबलची हत्या

शरद पवार म्हणाले, “मी अजिबात उत्तर देणार नाही. ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांची लायकी नाही. त्यांना कशाकशातून बाहेर काढले याची जर यादी दिली तर त्यांचं फिरणं देखील मुश्किल होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग मी सध्या बोलू शकत नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.

Lok Sabha Elections २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का, माजी मंत्र्यांनी दिला शिवसेनेचा राजीनामा

Spread the love