Crime News । ‘दाढीवाले काका आणि…’, ८ वर्षीय मुलीसोबत हॉस्टेलमध्ये घडलं भयानक; घटना वाचून बसले धक्का

Crime News

Crime News । माणुसकीला लाजवेल अशी घटना सध्या समोर आली आहे. एका हायप्रोफाईल बोर्डिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 2री च्या विद्यार्थिनीवर वसतिगृहात बलात्कार करण्यात आला. हे प्रकरण मिसरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडित मुलीचे वय अवघे ८ वर्षे आहे. मुलीच्या आईने फोन केल्यावर ही घटना उघडकीस आली.

Sharad Pawar | धनंजय मुंडेंचं नाव काढताच शरद पवार चिडले; पाहा Video

आईशी फोनवर बोलताच मुलगी ढसाढसा रडू लागली. वसतिगृहात तिच्यासोबत घाणेरडे कृत्य करण्यात आल्याचे तिने सांगितले.
हे ऐकून आईचे भान सुटले. तिने मुलीला शांत होण्यास सांगितले. शनिवारी वसतिगृहात डाळ आणि भात खायला दिल्याचे मुलीने सांगितले. त्यात काय मिसळलं होतं कुणास ठाऊक की ती जेवताच बेशुद्ध झाली. जेव्हा तिला शुद्धी आली तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत होत्या. मुलीच्या आईला हे ऐकताच आपल्या मुलीचे काय झाले असावे हे तिला समजले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली आहे.

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य

त्यानंतर मुलीचे मेडिकल केले असता मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी मुलीला १५ दिवसांपूर्वी वसतिगृहात दाखल केले होते. रविवारी त्यांनी मुलीला फोन केला असता तिने तिला झालेला त्रास त्यांना सांगितला. मुलीने तिच्या आईला सांगितले की, दाढीवाला काका आणि अन्य एका व्यक्तीने तिच्याशी घाणेरडे कृत्य केले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Mumbai Crime । धक्कादायक प्रकरण! तंदुरी चिकनसाठी हत्या, मुख्यमंत्री कार्यालयात तैनात कॉन्स्टेबलची हत्या

Spread the love