Sharad Pawar । सत्तेत गेल्यानंतर काहींची चाैकशी बंद झाली, शरद पवारांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा

Sharad Pawar

Sharad Pawar । पुणे : राष्ट्रवादीबाबत (NCP) निवडणूक आयोगाने (Election Commission) मागच्या काही दिवसापूर्वी ऐतिहासिक निर्णय दिला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना (Ajit Pawar) दिले. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. अशातच आता शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका (Sharad Pawar vs Ajit Pawar) केली आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. (Latest marathi news)

Pankaja Munde । पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं खळबळ! म्हणाल्या; “राजकारणात वनवास झाला, दगाफटका…”

बोलताना शरद पवार म्हणाले की, “राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत (BJP) गेलो, असे काही लोक सांगत आहेत. पण हा दावा खोटा आहे. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली आहे. म्हणून विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे,” असा टोला अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांनी लगावला आहे. (Sharad Pawar on Ajit Pawar)

MNS । राज ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

“ईडीचा गैरवापर केला जातोय. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा आश्चर्यकारक आहे. ज्यांनी पक्ष काढला त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्याला देणे, असा प्रकार य़ा देशामध्ये या आधी कधी झाला नव्हता. ते सुद्धा निवडणूक आयोगाने करुन दाखवले.मात्र याबाबत माझी खात्री आहे की, लोक या गोष्टीला समर्थन देणार नाहीत. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ”, असेही शरद पवार म्हणाले आहे.

Maratha Reservation । आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक, ‘या’ दिवशी असणार महाराष्ट्र बंद

Spread the love