Ashok Chavan । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अशोक चव्हाण यांच्यासह ११ आमदार भाजपमध्ये जाणार?

Ashok Chavan

Ashok Chavan । राज्यात लवकरच निवडणुका (Election in 2024) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. कधीही निवडणूक आयोग (Election Commission) निवडणुका जाहीर करू शकते. आगामी निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे. अशातच निवडणुकांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. (Latest marathi news)

Sharad Pawar । सत्तेत गेल्यानंतर काहींची चाैकशी बंद झाली, शरद पवारांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत. अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्याने राजीनाम्याची (Ashok Chavan resigns) चर्चा सुरू झाल्या आहेत. इतकेच नाही तर ते नॉट रिचेबल असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Pankaja Munde । पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं खळबळ! म्हणाल्या; “राजकारणात वनवास झाला, दगाफटका…”

अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असल्याच बोलल जात आहे. अशोक चव्हाण यांच्यासह पक्षातील अनेक आमदारदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

MNS । राज ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Spread the love