Pankaja Munde । पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं खळबळ! म्हणाल्या; “राजकारणात वनवास झाला, दगाफटका…”

Pankaja Munde

Pankaja Munde । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. कधीही निवडणूक आयोग (Election Commission) निवडणुका जाहीर करू शकते. आगामी निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे. सत्तेत अजित पवार गट आणि शिंदे गट सामील झाल्याने भाजपची (BJP) ताकद आणखी वाढली आहे. (Latest marathi news)

MNS । राज ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान आणि शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियानाची घोषणा केली आहे. अभियानांतर्गत 50 हजार युनिट्समध्ये एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Maratha Reservation । आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक, ‘या’ दिवशी असणार महाराष्ट्र बंद

यावेळी मुंडे यांनी आपल्यासोबत दगा फटका झाल्याचं जाहीर भाषणात सांगितले. बोलताना त्या म्हणाल्या की, “राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला, तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं असून मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Mithun Chakraborty Health Updates । मोठी बातमी! मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती कशी? रुग्णालयातून व्हिडीओ समोर

Spread the love