Lalit Patil । ड्रग्ज माफिया ललित पाटीलची तब्येत बिघडली; रुग्णालयातच उपचार सुरू

Lalit Patil

Lalit Patil । मागच्या काही दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात ललित पाटील याला अटक केली होती. आता ललित पाटील याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. ललित पाटील याला पोट दुखी आणि हरण्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली शहांची भेट

मागच्या चार दिवसापासून ललित पाटीलला हा त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार होत आहेत. ललित पाटील याला कोणताही गंभीर आजार नाही पण त्याला पोट दुखी आणि हरण्याचा त्रास होतोय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे नियमित उपचार झाल्यानंतर त्याची रवानगी पुन्हा कोठडीत केली जाणार आहे.

Uddhav Thackeray । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी ड्रग्स प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर तो जेलमध्ये कैद होता. तो येरवडा कारागृहात मागच्या तीन वर्षापासून कैद होता. या कालावधीमध्ये ललित पाटील नऊ महिने पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचारात निमित्त दाखल होता. यावेळी उपचार सुरू असताना अचानक तो फरार झाला. त्याच्या फरार होण्याचे सीसीटीव्ही देखील समोर आले होते. यानंतर पोलिसांनी प्रचंड तपास करून त्याला १५ दिवसांनी अटक केली.

Pune Accident । पहाटेच्या सुमारास पुणे शहरात मोठा अपघात! कंटेनरची ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक; दोन जण जागीच ठार

Spread the love