Sharad Pawar | शरद पवार यांनी धनगर समाजासाठी एकही काम केले नाही; भाजप आमदार पुन्हा बरळले

Sharad Pawar

Sharad Pawar | राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी अजुनही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असा संघर्ष पाहायला मिळता आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी जयसिंघानीयाला मोठा धक्का, ईडीने जप्त केली ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता

कार्यक्रमामध्ये बोलताना पडळकर म्हणाले, “शरद पवार यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये धनगर समाज तसेच अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान होईल, असे एकही समाजोपयोगी काम केले “, अशी जहरी टीका पडळकर यांनी केली आहे. दरम्यान,यापूर्वीही पडळकरांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याला झाली अटक

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना तत्कालीन राजकारण्यांनी जनतेच्या फायदयाचे निर्णय घेतले नाहीत. जनहितार्थ निर्णय घेण्याऐवजी स्वतःचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला, असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार येताच त्यांनी समाजाच्या फायदयाचे निर्णय घेतले. बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) याचे हात बळकट करण्यासाठी फडणीवसांच्या पाठीशी उभे राहा, असे ते म्हणाले.

Maharashtra Rain Alert : सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *