Sharad Pawar । जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) मोठी दरी निर्माण झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यात प्रथमच ते सभा घेणार आहेत. शहरातील सागर पार्क मैदानावर आज दुपारी ही तीन वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते कोणाला टार्गेट करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)
Milk Cow Species । ‘या’ आहेत सर्वाधिक दूध देणाऱ्या गाई, दिवसाला देतात 50 लिटरपेक्षा जास्त दूध
या सभेसाठी 30 हजार नागरीक या ठिकाणी उपस्थित राहतील असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. सभा घेण्यापूर्वीच त्यांनी सरकारवर निशाणा साधला. G20च्या निमंत्रण पत्रिकेवर ‘President Of India’ च्या ऐवजी ‘President Of Bharat’ लिहलं आहे. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, “इंडिया काय किंवा भारत काय मला त्यावर कोणताही वाद घालायचा नाही”, असं पवारांनी स्पष्ट केले.
Highway Accident । भीषण अपघात! कार-ट्रकच्या धडकेत ४ ठार तर ३ गंभीर जखमी
इंडिया बैठकीत सहभागी झालेले पक्ष प्रमुखांची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. इंडिया हे नाव हटवण्याचा कोणालाही आधिकार नाही. हे कोणीही नाव हटवू शकत नाही. आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वाढवण्याची गरज असून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे बरोबर नाही. असं शरद पवार म्हणाले आहेत.