Viral Video । जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान तिच्या टीम आरसीबीला चीअर करण्यासाठी अभिनेत्री अहमदाबादला पोहोचली होती. जरी RCB सामना जिंकू शकला नसला तरी जान्हवी कपूर आणि तिचा मैत्र ओरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चाहत्यांनी जान्हवीवर फेकले फोन?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर आणि ओरी स्टँडवर मॅच एन्जॉय करताना दिसत आहेत. अभिनेत्रीने निळ्या रंगाचा डेनिम ट्यूब टॉप घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. ओरी आणि जान्हवी त्यांच्या चाहत्यांकडे खाली पाहताच मोबाईल फोन खालून वरती चाहत्यांनी फेकले. चाहते दोन्ही स्टार्सवर फोनचा वर्षाव करत होते.
Pandurang Sakpal । ब्रेकिंग! ठाकरे गटावर मोठी शोककळा; कट्टर शिवसैनिकाचे निधन
चाहत्यांना त्यांनी सेल्फी घ्यायचा होता, म्हणूनच त्यांनी फोन ओरी आणि जान्हवीच्या दिशेने फेकून दिला, जेणेकरून फोटो काढता येईल. त्यादरम्यान जान्हवी आणि ओरी मोबाईल पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतं. हा सीन इतका मजेशीर आहे की चाहत्यांनाही हसू आवरता आले नाही.
Maharashtra Board Result । ब्रेकिंग! ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल; समोर आली मोठी अपडेट