Shrikant Shinde । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! शरद मोहोळच्या साथीदाराने घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

Shrikant Shinde

Shrikant Shinde । राजकीय गोटातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर (Hemant Dabhekar) याने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या गुन्ह्यात साथीदार असून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा सोशल मीडियावर (Social media) फोटो पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. (Latest marathi news)

“मा. गृहमंत्री देवेन्द्रजी, जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचे इतके बळ का वाढले आहे? या परिस्थितीस जबाबदार कोण आहे? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते समजेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!’, अशी आशयाची पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.

Ganpat Gaikwad Firing । बिग ब्रेकिंग! गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हेमंत दाभेकरवर खंडणी, अपहरण, खून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून वाढदिवसाचं निमित्त असलं तरी या भेटीमागचं काही वेगळं कारण आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! काँग्रेसला पडणार मोठे भगदाड? 15 आमदार अजित पवार गटात होणार सहभागी?

Spread the love