Ganpat Gaikwad Firing । बिग ब्रेकिंग! गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ganpat Gaikwad Firing

Ganpat Gaikwad Firing । भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता या प्रकरणानंतर राज्य सरकारने (State Govt) एक मोठा निर्णय घेतला आहे. (Latest marathi news)

Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! काँग्रेसला पडणार मोठे भगदाड? 15 आमदार अजित पवार गटात होणार सहभागी?

सरकारने आता पोलिसांना राजकारणी,बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांसह जणांच्या बंदुकीचे लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे. आतापर्यंत ठाण्यात जवळपास ४ हजार जणांना बंदुकीचे लायसन्स (Gun license) दिले आहे. यामध्ये अनेक राजकारणी, बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांचा समावेश असून यामध्ये राजकारणी बंदुकीचे लायसन्स मिळवण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. (Ganpat Gaikwad Firing Case)

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अटक करा, बड्या नेत्याची मागणी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

पण आता आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणामुळे ठाणे पोलीस आता सर्वच लायसन्सची पडताळणी करणार आहेत. महत्वाचे म्हणजे आवश्यकता नसेल त्यांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता कोणालाही बंदूक बाळगता येणार नाही. पडताळणीमध्ये बंदुकीचे लायसन्स का हवे? याचे कारण जाणून घेतले जाईल.

Actor Sridevi News । श्रीदेवी मृत्यू प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती

Spread the love