Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! काँग्रेसला पडणार मोठे भगदाड? 15 आमदार अजित पवार गटात होणार सहभागी?

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Election 2024) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आता राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कॉंग्रेस पक्षातील काही आमदार फुटीरतेच्या मार्गावर आहेत, असे बोलले जात आहे. (Latest marathi news)

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अटक करा, बड्या नेत्याची मागणी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) हे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात सामील होतील, अशी सध्या पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता या भेटीनंतर या अशा चर्चा रंगल्या आहेत.

Actor Sridevi News । श्रीदेवी मृत्यू प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती

मुंबईमध्ये अजित पवार गटाकडे मुस्लीम मातांना आकर्षित करणारा चेहरा नाही. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांना आपल्याकडे खेचण्याची तयारी अजित पवार गटाकडून केली जात आहे. 20 मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या समारोप होणार आहे. त्यापूर्वी पक्ष बदलण्यासाठी या आमदारांना प्रवृत्त केले जात आहे. अशातच अजित पवार गटाच्या एका नेत्याने काँग्रेसचे कमीत कमी 15 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे, असा दावा केला आहे.

Viral Video । मुलगी प्रियकरासह घरातून पळत होती, बसस्थानकावर भावाने दोघांना पकडले, मग पुढे घडले असे की…

Spread the love