Bjp । निवडणुका तोंडावर येतील तसे बडे नेते पक्ष बदलत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय नेते पक्षांतर करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी राजकीय मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र असं असलं तरी उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Ajit Pawar On Manoj Jarange । ब्रेकिंग! अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना दिला सर्वात मोठा इशारा!
उल्हासनगरचे भाजपा नगरसेवक राजेश वानखेडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला आहे. आगामी लोकसभेची तयारी सुरू असताना वानखेडे यांनी भाजपची साथ सोडल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Supriya Sule । शरद मोहळच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप!
माहितीनुसार, राजेश वानखडे यांनी अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किनीकर यांच्या विरोधात मागच्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये भाजप तर्फे उमेदवारी घेऊन राजेश वानखेडे यांचा अल्पमताने पराभव झाला होता.