Sanjay Shirsat । आता रोज नवीन धमाके होणार; शिंदे गटाच्या नेत्याचं सर्वात मोठ वक्तव्य

Eknath Shinde

Sanjay Shirsat । राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातून आमश्या पाडवी (Amshya Padvi) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंनी खूप मेहनत घेतली होती. पण आता तोच नेता शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pune crime । पोलीस दलात खळबळ! कोरेगाव परिसरात सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह

संजय शिरसाट म्हणाले, “आमश्या पाडवी हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर बुधवारपर्यंत रोज नवीन धमाके होतच राहणार आहेत, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आमश्या पाडवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. (Latest marathi news)

Lok Sabha Election । लोकसभेत उमेदवाराला किती खर्च करता येणार? जाणून घ्या महत्वाची माहिती नाहीतर..

अजूनही महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर झाला नाही. यावर देखील संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही काही जागांची अदलाबदली करणार आहोत. महायुतीचा तिढा सुटला आहे. उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार आहे. असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. (Sanjay Shirsat on Aamshya Padavi and Loksabha Election 2024 )

Supriya Sule । सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!

Spread the love