Indapur News । रिव्हॅाल्व्हर लोड केले, पाठीमागून कोयते घेऊन 5 जण आले, इंदापूरमधील गोळीबाराचा नवीन व्हिडीओ समोर

Indapur crime

Indapur News । पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur highway) इंदापूरजवळील हॉटेल जगदंबा येथे खुनाची भीषण घटना घडली. अविनाश बाळू धनवे असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश शनिवारी रात्री त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होता. त्याच्यासोबत तीन मित्र उपस्थित होते. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर सर्वजण आपापसात बसून बोलत होते. दरम्यान हॉटेलमध्ये दोघेजण घुसले. दोघांनी अविनाशवर मागून अनेक गोळ्या झाडल्या.

Sanjay Shirsat । आता रोज नवीन धमाके होणार; शिंदे गटाच्या नेत्याचं सर्वात मोठ वक्तव्य

या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये काही लोकांनी होटलमधे एंट्री करुन एका व्यक्तीच्या डोक्यात गोळ्या घातल्या असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फक्त गोळ्यांचं झाडल्या नाहीत तर कोयत्याने देखील वार करण्यात आले आहे. न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीने देखील ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Pune crime । पोलीस दलात खळबळ! कोरेगाव परिसरात सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह

हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येचे कारण समजू शकले नाही. या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना घडली तेव्हा लोक हॉटेलमध्ये जेवण करत होते. हत्येदरम्यान लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती.

Lok Sabha Election । लोकसभेत उमेदवाराला किती खर्च करता येणार? जाणून घ्या महत्वाची माहिती नाहीतर..

Spread the love