
Lok Sabha Election । काल दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. (Election date) कालपासूनच आचारसंहिता देखील लागू झाली आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने काही मर्यादा देखील घातल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवाराला किती खर्च करता येणार? असा सवाल उपस्थित होत आहे. (Latest marathi news)
Supriya Sule । सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!
उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या खर्चाची गणना सुरु होईल. पण हे लक्षात ठेवा की नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असेल आणि त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. लोकसभा निवडणुकीकरीता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी ठेवली आहे.
इतकेच नाही तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 40 लाख इतकी ठेवण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या आणि उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती देखील स्थापन करण्यात आल्या आहेत.
Manoj Jarange । मनोज जरांगे यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “माझा तो व्हिडीओ एडिट…”