Devendra Fadnavis । राजकरणात मोठी खळबळ! देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार? बड्या नेत्याचा दावा

Devendra Fadnavis । राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. सभांदरम्यान राजकीय नेते एकमेकांवर टीकादेखील करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक होणार असल्याचा दावा बड्या नेत्याने केला आहे. (Latest marathi news)

Ujjwal Nikam । सर्वात मोठी बातमी! पूनम महाजन यांना डावलून भाजपने दिली उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राज्यात आमचं सरकार येऊ द्या मग देवेंद्र फडणवीसांना अटक होतेय का नाही ते बघा. फडणवीस यांनी फोन टॅपिंग केले आहे. तर नरेंद्र मोदी यांनी मागील काही काळात खोटं बोलणारी पिढी निर्माण केली आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Maharashtra Politics । शरद पवार गटाला मोठा धक्का; भाजपने निवडणूक आयोगात दाखल केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?

“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रंग बदलले असे तु्म्ही म्हणता. पण तुम्ही काय बदललं? यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा बेडरपणा हा गुण घेतला नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे एक नंबरचे डरपोक असून नरेंद्र मोदी हे अपघाताने पंतप्रधान झाले आहेत. पण 4 जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर जहरी टीका; म्हणाले, ‘माझ्या कामाचं श्रेय…’,

Spread the love