Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की त्यांनी 80 च्या दशकात वाघाची शिकार केली होती आणि गळ्यात त्याचे तुकडे घातले होते. आता बुलढाण्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या वनविभागाने दातही जप्त केला आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी १९८७ मध्ये वाघाची शिकार करून त्याचे तुकडे गळ्यात घातल्याच्या दाव्यानंतर वनविभाग अॅक्शन मोडमध्ये आलं असून त्यांच्याकडील असणारा दात जप्त करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाने गुन्हा दाखल केला
वाघाचे दात फॉरेन्सिक ओळखीसाठी पाठवण्यात आले असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटातील या आमदाराने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून दावा केला होता की त्यांनी वाघाची शिकार केली होती. व्हिडिओची दखल घेत वनविभागाने कारवाई सुरू करत वाघाचे दात जप्त केले. बुलढाणा परिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी सांगितले की, आमदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Accident News । भयंकर अपघात! एका क्षणात संपुर्ण उध्वस्त; तलावात ट्रॅक्टर कोसळून 22 जण जागीच ठार