Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदेंना धमकी देणारा आरोपी 19 वर्षाचा विद्यार्थी; धक्कादायक माहिती समोर

Eknath Shinde And Shrikant Shinde

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने पुणे परिसरातून अटक केली आहे. आरोपींनी सोशल मीडियावरून धमकी दिली. आरोपींविरुद्ध कलम ५०६(२) आणि ५०५(१)(बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही माहिती दिली आहे.

Accident News । भयंकर अपघात! एका क्षणात संपुर्ण उध्वस्त; तलावात ट्रॅक्टर कोसळून 22 जण जागीच ठार

पोलिसांनी आरोपीला अटक केली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातील १९ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. शुभम वरकड असे आरोपीचे नाव असून तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील असून तो पुण्यात प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

Maharashtra Politics । काँग्रेसला नांदेडमध्ये मोठं खिंडार, 55 माजी नगरसेवकांनी दिला भाजपला पाठिंबा

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना 11 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनतर आरोपाला अटक करण्यात आली आहे. अटकेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या शुभम वरकड या १९ वर्षीय विद्यार्थ्याला शाखेने अटक केली.”

Nagpur Firing News । गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला! घरात घुसून व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या

Spread the love