Politics News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भुकंप? भाजप नेत्याचा दावा नेमका काय?

Devendr Fadanvis

Politics News । राज्याच्या राजकारणात मागच्या काही महिन्यांपासून मोठी उलथापालथ झाली आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज लावणे शक्य नाही. सध्या देखील लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतांना भाजप नेते आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत पुन्हा एकदा मोठे भाकीत केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदेंना धमकी देणारा आरोपी 19 वर्षाचा विद्यार्थी; धक्कादायक माहिती समोर

या आधी देखील गिरीश महाजन यांनी मोठे भाकीत केले होते. गेल्या वेळी असे भाकीत केल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात सामील झाले आहेत. हे सर्व महाराष्ट्रातील जनतेसाठी अनपेक्षित होत मात्र ते घडलं.

Accident News । भयंकर अपघात! एका क्षणात संपुर्ण उध्वस्त; तलावात ट्रॅक्टर कोसळून 22 जण जागीच ठार

येत्या आठवडाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक स्फोट होणार असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिरीश महाजन म्हणाले, मी मागच्या वेळी सांगितले होते की स्फोट होणार होता आणि झाला. सुप्रिया सुळे आणि अजितदादा यांच्यातील या भेटीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले याबाबत अजितदादाच सांगू शकतील. मात्र आठ दिवसांत राज्यात आणखी एक स्फोट होण्याची शक्यता आहे.” असंही भाकीत गिरीश महाजन यांनी केलं आहे.

Maharashtra Politics । काँग्रेसला नांदेडमध्ये मोठं खिंडार, 55 माजी नगरसेवकांनी दिला भाजपला पाठिंबा

Spread the love