Bajrang Punia । कुस्तीपटू बजरंग पुनिया हा माजी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या विरोधातील एक प्रमुख चेहरा होता. पण सध्या बजरंग पुनियाला मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतासाठी पदक जिंकणारे बजरंग पुनिया याने आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या निवड चाचणीमध्ये सामना गमावल्याने तो पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. (Latest marathi news)
Marriage Survey । ‘या’ कारणामुळे मुली लग्नाला देतात नकार, धक्कादायक रिपोर्ट आला समोर
ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनिया अस्वस्थ झाला आहे. त्याने शेवटचा सामना न खेळताच घर गाठले. विशेष बाब म्हणजे तो तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. उपांत्य फेरीत झालेल्या दारुण पराभवानंतर बजरंगने रागाच्या भरात भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्र सोडले.
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा डोपचा नमुना घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याकडेही बजरंगने दुर्लक्ष केले. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या पराभवामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आशियाई कुस्ती स्पर्धा 11 ते 16 एप्रिल दरम्यान आणि आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा 19 ते 21 एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत.
Ghazipur News । अतिशय भीषण अपघात! लग्नाला चाललेल्या बसवर पडली हायव्होल्टेज विजेची तार