Ind vs Eng । भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर

Ind vs Eng

Ind vs Eng । भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सध्या कसोटी सामने सुरु आहेत. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला आहे. या पराभवासह भारतीय संघ (Indian team) या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. या मॅचमध्ये भारतीय संघालाला विजयासाठी 231 रन्सचं टार्गेट होतं, पण संघ 202 रन्सवर ऑलआऊट झाली. (Latest marathi news)

UGC on Reservation । मोठी बातमी! विद्यापीठातील एससी, एसटी, ओबीसी आरक्षण रद्द होणार? केंद्रानं दिलं स्पष्टीकरण

संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला असून अशातच आता दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) दुसऱ्या कसोटी सामना खेळणार नाही. पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला बेन स्टोक्सने बाद केले. पण तो आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जात असताना त्याला काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं दिसत होतं.

Accident News । महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे आहे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याच्या जागी कुलदीप यादव खेळू शकतो. जडेजा संघासोबत विशाखापट्टणमला जाणार की बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार हे अजून समजले नाही.

India Alliance । इंडिया आघाडीला पुन्हा मोठा धक्का! नितीश कुमार यांच्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा निर्णय

Spread the love