Ravindra Dhangekar । रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का! अजित पवार गटाने दाखल केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

Ravindr Dhangekar

Ravindra Dhangekar । येत्या 13 मे ला पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रचाराची धामधूम पाहायला मिळत आहे. राजकीय घडामोडींचा देखील वेग आला आहे. पुण्यात महाविकास आघाडीने काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने पुणे महापालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर इतर पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही आहेत.

Baramti News । ब्रेकिंग! बारामतीत एमआयडीसीमध्ये भीषण आग; सगळीकडे धुरांचे लोळ

मात्र खरी लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यात आहे. दोन्हीही नेत्यांचा पुण्यात जोरदार प्रचार सुरु आहे. हे सर्व घडत असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Highway Accident | हायवेवर चुकीचा यू-टर्न घेत कार ट्रकला धडकली, 6 जण जागीच ठार

सूत्रांच्या माहितीनुसार, “धंगेकर यांनी घड्याळाचा फोटो वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदारांची दिशाभूल करणे आणि आमचं चिन्हं वापरणे हे गुन्हेगारी कृत्य आहे, असा आरोप अजित पवार गटाने केला असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर आयोगाने रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचं साहित्य जप्त करावं, अशी मागणी करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव गर्जे यांनी तक्रार दखल केली आहे.

Viral Video । जिम ट्रेनरचे महिलेसोबत भयानक कृत्य; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Spread the love