Ajit Pawar । अजित पवार त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे आणि रोखठोक भूमिकेमुळे ते कायम चर्चेत असतात. सध्या देखील अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एका आमदाराला निवडणुकीत पाडण्याचं चॅलेंज दिलं आहे. शिरुर या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार करत असताना झालेल्या सभेत अजित पवारांच्या रडारवर आमदार अशोक पवार आले.
शिरुरचे आमदार अशोक पवार पुन्हा आमदार कसा होतो, तेच पाहतो, असं अजित पवार म्हणाले आहेत. अशोक पवारांना पाडण्याचे थेट आव्हान अजित पवारांनी दिलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसापासून अमोल कोल्हे आणि अजित पवार एकमेकांवर टीका करत होते मात्र आता कोल्हेंच्या पराभवाची आखणी करणाऱ्या अजित पवारांच्या निशाण्यावर आता शिरुरचे आमदार अशोक पवार आले आहेत.
पाहा व्हिडिओ
पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, अजित पवारांचं शिरूरचे आमदार अशोक पवारांना चॅलेंज#LokSabhaElections2024 #AjitPawar #NCP pic.twitter.com/TM8QRP6QGD
— News18Lokmat (@News18lokmat) May 9, 2024