Highway Accident | हायवेवर चुकीचा यू-टर्न घेत कार ट्रकला धडकली, 6 जण जागीच ठार

Highway Accident

Highway Accident | सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात ५ मे रोजी एका ट्रकची कारला धडक बसून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार तर दोन जण जखमी झाले. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, हे कुटुंब सवाई माधोपूर येथील गणेश मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते.

Viral Video । जिम ट्रेनरचे महिलेसोबत भयानक कृत्य; पाहा धक्कादायक व्हिडीओ

चुकीचा यू-टर्न घेत कार ट्रकला धडकली

राजस्थानमध्ये दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर चुकीच्या पद्धतीने यू-टर्न घेत असलेल्या ट्रकला कार धडकल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन मुलेही जखमी झाली असून ट्रकचा चालक फरार झाला आहे. सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदीच्या पुलाजवळ रविवारी घडलेला हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Salman Khan Firing Case । सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सबाबत धक्कादायक खुलासा

ज्यामध्ये ट्रक चालकाचा निष्काळजीपणा समोर आला. फुटेजमध्ये कार ट्रकच्या मागे जाताना दिसत आहे. अचानक ट्रकने यू-टर्न घेतला आणि त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार त्याच्यावर आदळली. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Lok Sabha Election । बारामतीतून निवडणूक कोण जिंकणार? अजित पवार स्पष्टच बोलले म्हणाले, ‘मला वाटतं…’

Spread the love