Ravikant Tupkar । आताच्या घडीची मोठी बातमी! रविकांत तुपकर यांना पोलिसांनी केली अटक

Police arrested Ravikant Tupkar

Ravikant Tupkar । शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रविकांत तुपकर हे नेहमीच लक्ष देत असतात. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी रविकांत तुपकर कायमच आंदोलन करत असतात. सोयाबीन, कापूस प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविकांत तुपकर हे 11 जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना मलकापुरात पोहोचण्यापूर्वीच अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अजित पवार संतापले, म्हणाले “ती लोकं मूर्ख, त्यांची कीव…”

माहितीनुसार, रविकांत तुपकर काल रात्रीपासूनच भूमिगत होते. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. त्याचबरोबर त्यांच्या घराभोवती देखील पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पोलिसांची अनेक पथके त्यांना शोधण्यासाठी रवाना झाली होती. दरम्यान आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Gujarat News । गुजरातमध्ये भीषण अपघात, 25 हून अधिक विद्यार्थ्यांसह बोट तलावात बुडाली, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू

सायंकाळी ७च्या दरम्यान गाडी बदलून मलकापूरकडे जात असताना राजुर घाटात पाठलाग करून पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. कलम 151 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Actress Life । प्रसिद्ध अभिनेत्रीवर जमावाची दगडफेक, पोलीस कर्मचारी जखमी; थोडक्यात बचावली अभिनेत्री

Spread the love