Actress Life । प्रसिद्ध अभिनेत्रीवर जमावाची दगडफेक, पोलीस कर्मचारी जखमी; थोडक्यात बचावली अभिनेत्री

Actress Akshara Singh

Actress Life । 17 जानेवारीला औरंगाबाद, बिहारमध्ये मोठा गदारोळ झाला होता. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Actress Akshara Singh) येथे एका उद्घाटन कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिला पाहण्यासाठी लोक इतके नियंत्रणाबाहेर गेले की सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली. एकीकडे पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली, तर दुसरीकडे लोकांनीही दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले.

Mumbai Crime । इंजीनियर तरुणाचं धक्कादायक कृत्य! अभिनेत्रीचे न्यूड फोटो तिच्याच कुटुंबीयांना पाठवले

काही नेत्यांनी हा गदारोळ थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. पोलीस आता या दगडफेकीच्या घटनेचा तपास करणार आहेत. जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

Rajan Salvi । ब्रेकिंग न्यूज! ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल

अक्षरा सिंह औरंगाबादच्या दाऊदनगरमध्ये आली होती. खासगी आस्थापनेच्या संचालकांनी उद्घाटनासाठी अभिनेत्रीला बोलावले होते. दरम्यान, ती येथे येणार असल्याची बातमी जनतेला मिळाली. अभिनेत्रींच्या आगमनाच्या काही तास आधी परिसरात लोक जमा झाले. काही वेळाने अक्षरा सिंह आली आणि सुरक्षेमध्ये आस्थापनात गेली. त्याठिकाणी त्यांनी उद्घाटन करून आस्थापना चालकांशी काही वेळ चर्चा केली. यानंतर उद्घाटनानंतर बाहेर पडताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. आणि मोठा गोंधळ झाला. आणि लोकांनी दगडफेक देखील केली.

INS Visakhapatnam । मोठी बातमी! 9 भारतीय असलेल्या जहाजावर ड्रोन हल्ला, धक्कादायक फोटो समोर

Spread the love