Ajit Pawar । ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अजित पवार संतापले, म्हणाले “ती लोकं मूर्ख, त्यांची कीव…”

Aijit Pawar

Ajit Pawar । मागच्या दोन दिवसापूर्वी राज्य सरकारच्या काही बड्या नेत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Actress Life । प्रसिद्ध अभिनेत्रीवर जमावाची दगडफेक, पोलीस कर्मचारी जखमी; थोडक्यात बचावली अभिनेत्री

विरोधकांकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री सोडता इतर चार नेते अत्यंत दाटी-वाटीने बसल्याचे पाहायला मिळाले. यावर अनेक वेगेवेगळे मिम्स देखील व्हायरल झाले.

सत्ताधाऱ्यांची गाडीमधील झालेली दाटीवाटी पाहून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय. आता या व्हायरल व्हिडिओवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला मूर्ख म्हटल आहे. त्याचबरोबर संबंधित व्हिडिओ जे व्हायरल करत आहेत त्यांची आपल्याला कीव येत असल्याचे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

INS Visakhapatnam । मोठी बातमी! 9 भारतीय असलेल्या जहाजावर ड्रोन हल्ला, धक्कादायक फोटो समोर

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, “आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नसून आम्ही दाटी-वाटीने सर्वांना समजावून घेणारी माणस आहोत. त्यामुळे मला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही”. असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितल आहे.

Manoj Jarange Patil । पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणाबाबत सर्वात मोठे वक्तव्य!

Spread the love