अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिच्याकडे अनेक वर्षांपासुन कामावर असलेल्या मॅनेजरने ₹80 लाखांची फसवणूक केल्याची माहिती मागच्या दोन चार दिवसापूर्वी समोर आली होती. या प्रकरणावर अभिनेत्रीने आत्तापर्यंत कोणतेही भाष्य केले नव्हते. दरम्यान सध्या या प्रकरणाबाबत रश्मिका मंदानाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय पूजा अजित पवार करणार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
याबाबत रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हंटले आहे की, “मॅनेजरने स्वत: नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलाय. कोणी कोणाला काढलेले नाही असे म्हटले आहे.
त्याचबरोबर तिने पुढे या पोस्टमध्ये म्हंटले आहे की,” आमच्या दोघांमध्ये कोणतीही नकारात्मक भावना नाही. आम्ही मनानेच वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या अफवांमध्ये काही सत्य नाहीये. आम्ही आता वेगळे होऊन काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.