वहिनी आणि दिर यांचं नातं खूप भारी असत. वहिनीला आईसमान मानलं जात. मात्र सध्या या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नागपूरमधील अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिराने आपल्या वहिनीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर वर्षभर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. (Marathi News)
ही महिला मूळची मध्यप्रदेशची रहिवाशी असून ती मागच्या एक वर्षांपूर्वी नागपूरमध्ये राहायला आली आहे. तिचा नवरा सुरक्षा रक्षकाच काम करत असून आरोपी व्यक्ती हा त्यांचा लांबचा नातेवाईक आहे. आरोपीने या महिलेचा कपडे बडतानाचा एक व्हिडीओ शूट केला आणि तिला व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करू लागला.
मॅनेरजने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्यानंतर रश्मिका मंदानाने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…
गेल्या एक वर्षापासून आरोपी महिलेवर बलात्कार करत होता. याबाबत महिलेने तिच्या पतीकडे केली देखील तक्रार केली मात्र, ही कौटुंबिक बाब असूनही पतीने देखील त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
पुढच्या वर्षी विठ्ठलाची शासकीय पूजा अजित पवार करणार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
मागच्या २ दिवसांपूर्वी देखील आरोपीने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला त्याचबरोबर मुलालाही मारण्याची धमकी देत होता. यावेळी छळाला वैतागून महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकाराबाबत पोलीस अधिकच तपास करत आहेत.