मुंबई । हार्बर मार्गावर एका चालू लोकलमध्ये २० वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत गृहखात्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही. पुन्हा एकदा मुंबई (Mumbai) लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. याला गृह खात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे,” असे संतप्त ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी नगरसेविकेचा शेकडो कार्यकर्त्यांस शिंदे गटात प्रवेश
मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ७ सात वाजून २८ मिनिटांनी सीएसएमटीवरून पनवेलला जात असणाऱ्या लोकलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी ट्रेन सुरू होताच महिलांच्या डब्यात शिरला. त्याने त्या तरुणीवर अत्याचार केले. मस्जिद स्थानक येताच पीडित तरुणीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
चक्रीवादळ धडकण्याआधी अंगावर काटा आणणाऱ्या घडामोडी; पाहून व्हाल थक्क
या वरून सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर निशाणा साधला आहे. “संतापजनक! चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही अतिशय संतापजनक घटना असून त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे” असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘त्या’ एका व्हिडिओने तरुणाचे नशीबच बदलले! २४ वर्षीय सौरभ महिन्याला कमावतोय 80 लाख रुपये