बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे. किनारपट्टीवर 130 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. वादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय लष्कर, एनडीआरएफसह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचे मंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आपला तेलंगणा दौरा रद्द केला आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी नगरसेविकेचा शेकडो कार्यकर्त्यांस शिंदे गटात प्रवेश
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गांधीनगर येथील राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रात चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. कच्छ, जामनगर, मोरबी, राजकोट, देवभूमी द्वारका, जुनागढ, पोरबंदर आणि गीर सोमनाथ या आठ किनारी जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानी नेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर, नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलासह सर्व सशस्त्र दलांनी गुजरातमधील स्थानिक लोकांना मदत देण्यासाठी आवश्यक तयारी केली आहे.
Ajit Pawar । अजित पवार यांना मोठा धक्का! जवळच्या विश्वासू नेत्याने केला ‘बीआरएस’मध्ये प्रवेश