उल्हासनगर । जरी सत्तेत असले तरी भाजप आणि शिवसेनेतील वाद अजूनही शांत झाला नाही. उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून भाजप विरोधात बॅनर बाजी करण्यात आली होती. उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशन यांनी हा बॅनर लावला होता.याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
चक्रीवादळ धडकण्याआधी अंगावर काटा आणणाऱ्या घडामोडी; पाहून व्हाल थक्क
“50 कुठे आणि 105 कुठे? हा आमचा भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस सिर्फ नाम ही काफी है! अशा आशयाचा भाजपकडून बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरमुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
‘त्या’ एका व्हिडिओने तरुणाचे नशीबच बदलले! २४ वर्षीय सौरभ महिन्याला कमावतोय 80 लाख रुपये
परंतु, आता शिवसेनेला चिमटा काढणारा तो बॅनर मध्यरात्रीच्या दरम्यान चोरीला गेला आहे. जर प्रत्युत्तर द्यायचंच असेल, तर ते कामातून द्या. चोरी करून नाही, असा टोलाही भाजपने शिवसेनेला लगावला आहे.
नेहा कक्कर अवघ्या 70 रुपयांसाठी करायची ‘हे’ काम; आज आहे कोट्यवधींची मालकीन
अशातच मागील तीन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व वर्तमानपत्रातील जाहीरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तुलनेत जास्त लोकप्रिय असल्याचे जाहीरातीत सांगण्यात आले आहे. यावरून भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.