Ahmednagar Accident । अहमदनगरमध्ये पहाटेच्या सुमारास पिकअपचा भीषण अपघात; चिमुकलीचा मृत्यू तर ३ जण जखमी

Ahmednagar Accident

Ahmednagar Accident । सध्या अहमदनगरमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगर कल्याण रोडवर कर्जुले (Ahmednagar- Kalyan Road Accident) हद्दीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पिकअपचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये एक चिमुकली जागीच ठार झाली आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Crime News । थरकाप उडवणारी घटना! ९ महिन्यांच्या चिमुकलीसह पतीने केली पत्नीची गळा चिरुन हत्या

या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक तातडीने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली. अपघातामधील सर्व जखमी लोकांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Havaman Andaj । ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पावसाला सुरवात; जाणून पुढील दोन दिवसाचे हवामान

त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप मधील प्रवास करणारे सर्व प्रवासी हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्वजण मंचरहुन पारनेरकडे यात्रेसाठी निघाले असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र यावेळी पिकपचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; आणखी एक नेता करणार भाजपात प्रवेश

Spread the love