Lok Sabha Elections 2024 । रामराजे निंबाळकर यांचा भाजपला गंभीर इशारा; म्हणाले, “माढ्यातील एक खासदार पडला, तर…”

Lok Sabha Elections 2024

Lok Sabha Elections 2024 । लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) बिगुल वाजलं आहे. पण निवडणुका होण्यापूर्वी राज्यात नाट्यमय घडामोडी घटना पाहायला मिळत आहे. याचा परिणाम राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे. (Latest marathi news)

Shirdi Politics । शिर्डी लोकसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का, श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटात

बोलताना रामराजे निंबाळकर म्हणाले की, “माढ्यातील एक खासदार पडला, तर दिल्लीतील लोकांना काय फरक पडतोय. हा फक्त फलटणचा प्रश्न नाही, तर खटाव आणि माणचाही प्रश्न आहे. मी ठराविक लोक घेऊन अजितदादांना (Ajit Pawar) जाऊन भेटणार आहे,” असे रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी दिल्याने रामराजे नाईक निंबाळकर नाराज असून त्यांनी आता ही नाराजी बोलून दाखवली आहे.

Ravindr Dhangekar । ब्रेकिंग! पुण्यातून सर्वात मोठी बातमी समोर; लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच रवींद्र धंगेकर अडचणीत

“अजित पवारांना आम्ही स्पष्टपणे सांगणार आहे की, भाजपला इतक्या विरोधानंतरही उमेदवार कायम ठेवायचा असल्यास मतदान कमी झालं म्हणून आम्ही जबाबदार राहणार नाही. मग तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही ते करा”, असे रामराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! या बड्या नेत्याने उडवली अजित पवारांची झोप

Spread the love