Shirdi Politics । शिर्डी लोकसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का, श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटात

Shirdi Politics

Shirdi Politics । लोकसभा निवडणुकीचं (Losabha election) बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. पण काही नेत्यांना तिकीट नाकारल्याने ते पक्षांतर करत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बड्या नेत्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. (,Latest marathi news)

Ravindr Dhangekar । ब्रेकिंग! पुण्यातून सर्वात मोठी बातमी समोर; लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच रवींद्र धंगेकर अडचणीत

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! या बड्या नेत्याने उडवली अजित पवारांची झोप

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा भाऊसाहेब कांबळे यांना होती. पण उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना डावलून भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली. त्यामुळे कांबळे नाराज झाले होते. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. अशातच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Praniti Shinde । काँग्रेसचं ठरलं! सोलापूर मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर; भाजपकडून कोण असणार उमेदवार?

Spread the love