Baba Ramdev । ब्रेकिंग! बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा पुन्हा मोठा धक्का

Baba Ramdev

Baba Ramdev । बाबा रामदेव यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणाशी संबंधित अवमान प्रकरणात दिलासा न मिळाल्यानंतर आता आणखी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता बाबा रामदेव यांचा योग शिबीर सेवा कराच्या कक्षेत येणार आहे. बाबा रामदेव यांच्या योग शिबिरांचे आयोजन करणाऱ्या ‘पतंजली योगपीठ ट्रस्ट’ला आता या कार्यक्रमांसाठी सेवा कर भरावा लागणार आहे.

Crime News । धक्कादायक! भाऊ-बहीण मृतावस्थेत, आई गंभीर जखमी; वडिलांबाबत समजताच….

सेवाकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला असून योग शिबिरांवर सेवाकर लावण्याचे समर्थन केले आहे. यामुळे रामदेव बाबांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Parth Pawar । मोठी बातमी! पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक

न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना पतंजली योगपीठ ट्रस्टचे अपील फेटाळून लावताना आपल्या निर्णयात म्हटले आहे की, “सेवाकर अपील न्यायाधिकरणाने ते योग्यच म्हटले आहे. प्रवेश शुल्क आकारल्यानंतर शिबिरांमध्ये योगासने करणे योग्य आहे. सेवा न्यायाधिकरणाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही.

Rajasthan Accident । भीषण अपघात, लग्नातील पाहुण्यांनी भरलेली मिनी बस अनियंत्रित ट्रॉलीला धडकली, 9 जणांचा मृत्यू

Spread the love