Raj Thackeray । एकीकडे युतीची चर्चा तर दुसरीकडे भाजपने राज ठाकरेंना दिला सर्वात मोठा धक्का

Raj Thackeray

Raj Thackeray । राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सगळीकडे लोकसभेची धामधूम पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापासून महायुती राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे भाजप युतीचा प्रस्ताव देत आहे तर दुसरीकडे रविवारी संध्याकाळी मुंबईत, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत मनसेचे 650 पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे.

Bjp । ब्रेकिंग! भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत भाजपने मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसे कार्यकर्त्यांसह शेकडो प्रदेश उपाध्यक्ष आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज प्रवेश सोहळा पार पडणार आहे. मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेल्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, विभागीय अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, दोन विभागीय सचिव, पाच उपविभाग अध्यक्ष (महिला व पुरुष), दोन उपसचिव, 11 पुरुष व महिला शाखा अध्यक्ष, 80 महिला आणि 80 महिलांचा समावेश आहे.

Pranav Karad । धक्कादायक बातमी! पुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; 3 दिवसांपासून शोधाशोध सुरु

राज ठाकरे यांनी अमित शहा यांचीही भेट घेतली

राज ठाकरे यांचा महाआघाडीत समावेश करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी राज ठाकरे महाआघाडीत सामील होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. राज ठाकरे यांनी स्वतः दिल्ली गाठून अमित शहा यांची भेट घेतली होती.

Eknath Khadse । सर्वात मोठी बातमी! एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; स्वतःच केला खुलासा

Spread the love