Pranav Karad । धक्कादायक बातमी! पुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; 3 दिवसांपासून शोधाशोध सुरु

Pranav Karad

Pranav Karad । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामधील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिका या ठिकाणाहून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रणव हा अमेरिकेमध्ये एका जहाजावर काम करत होता. मात्र तो अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रणवच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे प्रणवच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून कुटुंबातील लोक चिंतेत आहेत.

Eknath Khadse । सर्वात मोठी बातमी! एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; स्वतःच केला खुलासा

याबाबत अधिकची माहिती अशी की, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रणव काम करत होता. या कंपनीच्या जहाजावर प्रणव डेट कॅडेट म्हणून काम करायचा. मागच्या तीन दिवसापासून तो बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे. प्रणवला मुंबईतल्या कंपनीने शोधण्यास सुरुवात केली आहे मात्र आतापर्यंत कोणतीच समाधानकारक माहिती मिळाली नाही. असे देखील त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

Prakash Ambedkar । बीडमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला उमेदवार; पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या उमेदवाराला देणार टक्कर

पुणे येथील वारजे परिसरात राहणारा प्रणव कराड हा मागच्या सहा महिन्यापासून मुंबईतील विल्समन शिप मॅनेजमेंट इंडिया या कंपनीत नोकरीला आहे. 22 वर्षीय प्रणव शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. तो ज्यावेळी बेपत्ता झाला त्यावेळी सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रवास करणाऱ्या टँकर जहाजावर तैनात होता. याबाबत फोन करून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

Sharad Pawar । माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणूक लढवणार? महत्वाची माहिती समोर

Spread the love