Eknath Khadse । सर्वात मोठी बातमी! एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; स्वतःच केला खुलासा

Eknath Khadse

Eknath Khadse । मागच्या काही दिवसापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता स्वगृही परतणार आहेत. मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चानंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी या चर्चेंबाबत मोठा खुलासा केला आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Prakash Ambedkar । बीडमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला उमेदवार; पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या उमेदवाराला देणार टक्कर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत देखील एकनाथ खडसे यांनी भावनिक वक्तव्य केल आहे. मी शरद पवार यांचा ऋणी राहीन त्यांनी मला संकट काळात मदत केली आहे असं ते म्हणाले आहेत, त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे.

Sharad Pawar । माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणूक लढवणार? महत्वाची माहिती समोर

एकनाथ खडसे म्हणाले, “भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची मी भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा असा माझा प्रयत्न आहे. माझा प्रवेश हा दिल्लीमध्ये होणार आहे. ज्या दिवशी मला दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून बोलवलं जाईल त्या दिवशी माझा पक्षप्रवेश होईल अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

Bacchu Kadu । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! बच्चू कडू यांनी दिला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

Spread the love