Rain Update । महाराष्ट्रात सध्या थंडीचा कडाका जाणवताना, पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या उत्तरेतील भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 10 अंशांपर्यंत पोहोचलं आहे, तसेच ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे पावसाच्या सरींची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने पुढील 24 तासांत कोकण किनारपट्टी क्षेत्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या भागांमध्ये हलक्या सरींना भेट मिळू शकते. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्येही ढगाळ वातावरण असून, थंडीतही वाढ झाली आहे. येथील पावसाची शक्यता जास्त आहे.
धुळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, जिथे पारा 5 अंशांवर पोहोचला आहे. रत्नागिरीमध्ये सर्वाधिक तापमान 33 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 11 जानेवारीला कोकणात तर 12 आणि 13 तारखेला मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे. पुण्यात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे, तसेच सायंकाळी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
Palghar News । पालघरमध्ये भाविकांच्या कारला भीषण अपघात, तीन तरूणांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी
सध्या उत्तर भारतात थंडीचा कडाका आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये थंडी कायम असून, हिमाचल प्रदेश आणि अन्य पर्वतीय भागांत जोरदार हिमवृष्टीची शक्यता आहे.
Buldhana News । महाराष्ट्रात या गावात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; तीन दिवसांत लोक होतात टकले